यावल, प्रतिनिधी । येथील बस स्थानक परिसरातील श्री काळ भैरव मंदिरात आज महाशिवरात्री च्या निमिताने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शहरातील जय भोले ग्रुप यावलच्या तरुणांनी मोठा सहभाग घेतला.
आज यावल शहरात महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी भाविकांसाठी फराळ व महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . जय भोले ग्रुप यावलच्या तरुणांनी यावेळी बसस्थानकावरील असलेल्या श्री काळभैरव मंदिराच्या जवळ भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी १oo किलो प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजित केला होते. या कार्यक्रमास यावल तालुक्यातील परिसरातील नागरिक व शहरातील शिवभक्त भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावल शहरात आज दिवसभर विविध ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद आणि फराळाचे कार्यक्रम भाविकांसाठी आयोजित करण्यात आले आहे . शहरातील चावडी परिसरात असलेल्या हनुमान मंदीराजवळ आज सकाळी हनुमान मित्र मंडळी ग्रुपच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला. कार्यक्रमास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या प्रसादाच्या कार्यक्रमास हनुमान मित्रमंडळाने आयोजीत केला होता. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी हनुमान मित्रमंडळाचे कार्यकर्ते गोपाळ चौधरी, महेश वाणी, मुरलीधर बारी , हर्षल पाटील, गिरिष पाटील , निखिल बडगुजर, दौलत बारी , संतोष कवडीवाले , भालचंद्र सराफ या तरूणानी परिश्रम घेतले. शहरातील गंगानगर परिसरातीत शिव मंदीरात आज सांयकाळी ६ वाजता शिवमंदीरात शिवभक्तांसाठी प्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे . याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे अवाहन गंगा नगर मित्र मंडळच्या वतीने करण्यात आले आहे.