यावल , प्रतिनिधी I देशाच्या पहील्या महीला पंतप्रधान स्व. इंदीरा गांधी यांची जयंती यावल येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आज उत्साहात साजरी करण्यात आली.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न प्राप्त स्व. इंदीरा गांधी यांची जयंती आज सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. यावल तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान आयर्न लेडी म्हणुन संपुर्ण जगात आपली ओळख निर्माण करणाऱ्या स्व.इंदराजी गांधी जयंती निमित्त भावपुर्ण आदरांजली वाहिली गेली. यात प्रभाकर आप्पा सोनवणे , इंटकचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक भगतसिंह देवनाथ पाटील, यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी , संजय गांधी निराधार समितीचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, काँग्रेस पक्षाचे यावल शहराध्यक्ष कदीर खान यांच्या प्रमुख उपस्थितात वाहण्यात आली. याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी भारतरत्न स्व . इंदीरा गांधी देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी दिलेले बलीदान देश कधीही विसरणार नाही असे भावनिक मनोगत व्यक्त करून त्यांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करून त्यांना आदरांजली वाहीली .
यावेळी जळगाव जिल्हा अनुसुचित जाती विभागाच्या उपाध्यक्ष चंद्रकलाताई ईगळे , यावल नगर परिषदचे गटनेता सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , माजी नगरसेवक गुलाम रसुल सेठ, माजी नगरसेवक पुंडलिक बारी, काँग्रेस कमेटीचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफार शाह, नगरसेवक मनोहरसोनवणे,नगरसेवक जाकीर शेख,नगरसेवक समिर शेख मोमीन , काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष रहेमान खाटीक,सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शेख नईम शेख शरीफ, नाना बोदडे , सामाजीककार्यकर्ते विक्कि गजरे आदी कार्यकर्त व पक्षाचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खरेदी विक्री संघाचे संचालक अमोल भिरूड यांनी तर आभार महिंद्र ससाणे यांनी मानले.