यावल येथे सोशल डिस्टन्सींगचा फज्जा

यावल प्रतिनिधी । येथे लॉकडाऊनच्या काळात उघड्या असणार्‍या दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सींगच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून आले आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने सर्वसामान्य नागरिकांना ग्रासले असून यासाठी जिल्हाधिकारी यांनी या संसर्गजन्य आजाराचे प्रसार थांबवण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे पावले उचलली आहेत. त्याकरिता नागरिकांनी काही नियम गजरा व अटी पाळण्याचे आदेश दिले आहेत. तथापि लॉकडाऊनच्या काळात काही दुकानदार शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशातून दिलेल्या अटी शर्तीचे नियम धाब्यावर ठेवून आपले व्यवसाय करीत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्गजन्य आजाराची वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी राज्य शासनाने कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव टाळण्यासाठी नागरिकांनी कुठलेही महत्त्वाचे कारण असल्याशिवाय घरा बाहेर फिरू नये; तसेच तोंडाला मास्क लावणे कुठल्याही दुकानावर खरेदी करताना सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करावे असे नियम आहेत. मात्र यावल शहरात व परिसरात काही दुकानदारांकडून जिल्हाधिकार्‍यांनी नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. तरी नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे

Protected Content