यावल प्रतिनिधी । अत्यावश्यक वैद्यकीय सेवा मेडिकल स्टोअर्स वगळता सर्व व्यवसाय किराणा दुकान, फळ विक्री, भाजीपाला व इतर व्यवसाय सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीतच सुरू राहतील असे जिल्हाधिकारी यांचे नव्याने आदेश आल्यामुळे शहरातील नेहमीच नागरिकांच्या गर्दीमुळे गजबजलेला राहात असलेला परिसर बुरुज चौक, भुसावळ टी पॉइंट व यावल चोपडा मार्ग आज मात्र सुकसुकाट व अतिशय शांत दिसून येत होता.
जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नव्या नियमांचा मोठा परिणाम दिसून आला असून दरम्यान केंद्र शासनावतीने पाठवण्यात आलेले जनधन योजना द्वारे ज्या नागरिकांनी आपल्या बँकेत खाते उघडले असतील त्या नागरिकांना प्रत्येकी ५०० रुपये विविध बँकेचे माध्यमातून मिळत असल्याने नागरिकांनी पैसे मिळण्याकरिता बँकांच्या बाहेर सोशल डिस्टन्स न पाडता मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यामुळे कोरोना सारखा गंभीर आजाराचे संसर्गजन्य वाढण्याची विधि व्यक्त होत आहे. तरी नागरिकांना यावलचे महसूल प्रशासन नगरपरिषद व पोलीस प्रशासन शासनाने दिलेल्या आदेशाच्या अनुसार वारंवार सूचना देऊन मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे तसेच कुठलेही महत्त्वाचे कारणाशिवाय घराबाहेर फिरू नये असे आदेश दिले असताना काही बेजबाबदार बेसावध राहून शहरांमध्ये फिरताना दिसत आहे. या रिकामटेकड्या नागरिकांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान नागरिकांनी स्वतःहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखावी व घरातच रहावे, असे आवाहन तहसीलदार जितेंद्र कुवर यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे तसेच यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी केले आहे.