यावल प्रतिनिधी । संचारबंदीच्या काळात तोंडावर मास्क आणि संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या १० जणांवर यावल पोलीसांनी कारवाई केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातील दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी व्हावा यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. असे असतांना यावल शहरात संचारबंदीचे नियम मोडून शहरात दुचाकीने निर्धास्त फिरत असलेल्या १० जणांवर यावल पोलीसांनी कारवाई केली. कोणतेही कारण नसतांना शहरात फिरत असतांना वेगवेगळे कारण सांगण्यात आले होते.
आज १२ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मुजफ्फर खान, पो.कॉ. संजय देवरे यांनी यांच्यावर पुढील १० जणांवर कारवाई केली. यात राज नटराज रा. विरार नगर, यावल, राजेंद्र कृष्णा महाजन रा. देशमुख वाडा यावल, जुबेर खान मोहम्मद खान रा. इस्लामपुरा यावल, अमोल रवींद्र माळी रा. साकळी, शेख साजिद शेख रशीद रा. डांगपुरा यावल, शेख मोहसीन शेख अकबर रा. इस्लामपूर यावल, रमजान रशिद तडवी रा. रामेश्वर कॉलनी जळगाव, शेख मुजाहिद शेख रउप रा. फैजपूर, यांच्याविरुद्ध संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील दुचाकी हस्तगत केली आहेत.