यावल प्रतिनिधी । येथील शहरातील शिवाजीनगर परिसरात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महाराष्ट्राचे अराध्य दैवत हिन्दवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, जळगाव जिल्हा परिषद कॉंग्रेसचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , तहसीलदार महेश पवार , पोलीस निरिक्षक सुधीर पाटील ,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंत पाटील , माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे , यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश पोपट येवले, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते, नगरसेवक अभीमन्यु उर्फे हंद्री चौधरी, इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील याशिवाय हेमंत येवले सर, मुबारक तडवी, संदीप सोनवणे, अॅड. निवृत्ती चौधरी, फारूक शेख, सईद शेख रशीद यांच्या शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, सामाजीक कार्यकर्ते, समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.