यावल प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत आपण कोरोना महामारीच्या युध्दात जिंकण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्विकारा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. यावल येथे आज लोकसहभागातून ऑक्सीजन पाईप लाईनचे लोकर्पण जिल्हाधिकारी राऊत यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी सांगितले की, संकटासमयी नागरीकांचे जिव वाचविण्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्यांना दानसुर नव्हे तर जिवनदाते म्हणावे लागेल नागरीक आणी प्रशासनाच्या एक जुटीने आपण संघर्ष करून कुठल्याही संकटावर विजय मिळवु शकता, असे मत मांडले.
आज १२ सप्टेंबर रोजी यावलच्या तहसील कार्यालयात यावल ग्रामीण रुग्णालयात लोकवर्गणीतुन बसाविण्यात आलेल्या ऑक्सीजन पाईपलाईनचे लोकाअर्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत हे होते तर प्रमुख पाहुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील, नगराध्यक्ष नौशाद तडवी, पं.स. सभापती पल्लवी चौधरी, गटनेते प्रभाकर सोनवणे, कृउबा सभापती तुषार पाटील, पं.स.सदस्य शेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयात लोकांच्या सहभागाने लोकवर्गणीतुन लावण्यात आलेल्या ऑक्सीजन पाईपलाईनच्या लोकाअर्पण कार्यक्रम संपन्न झाले. याप्रसंगी उपविभागीय प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या आवाहनास प्रतिसाद देत ज्या दानशुरांनी आर्थिक मदत केली त्याचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ अधिकारी जे.डी.बंगाळे यांनी केले तर प्रस्तावना प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी मांडली व उपस्थितांचे आभार तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी मानले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते यावल ग्रामीण रुग्णालयाच्या ऑक्सीजन पाईपलाईन बसविलेल्या ३o बेड रूमचे फित कापुन लोकाअर्पण करण्यात आले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी प्रांत अधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेन्द्र कुवर , यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमन्त बऱ्हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला, गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांच्यासह महसुल व आरोग्य प्रशासनाच्या कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.