यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र जालनाद्वारे पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच, आंगणवाडी सेविका यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
गटविकास अधिकारी डॉ.मंजुत्री गायकवाड-बोरसे यांच्याहस्ते राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत आयोजित २७ व २८ मार्च या दोन दिवसीय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, विस्तार अधिकारी हबीब तडवी, शिबीराचे प्रशिक्षक दिपक शिंपी, दिपक पाटील, आभियानाचे विस्तार अधिकारी व व्याख्याता म्हस्के, नागरे विस्तार अधिकारी व व्याख्याता जिटीसी जालना, ग्रामसेवक संघटनेचे यावल तालुकाध्यक्ष रूबाब तडवी, सचिव पी.व्ही. तळेले, सहसधिव हितु महाजन यांच्यासह ग्रामसेवक, १२ गावांच्या सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य, अगणवाडी सेविका, आशा वर्कर यांची उपस्थिती होती.
या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ९ शाश्वत विकास ध्येयांच्या संकल्पनांचे उध्दीष्ट गाठण्यासाठी ग्रामीण पातळीवर समाजातील सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक असावे, या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातुन गावपातळीवरगाव आरोग्य, घोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती स्थापन करणे, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती, गाव तंटामुक्त समिती, वन हक्क समिती, पर्यावरण संतुलन समृध्द गाव योजना अंतर्गत वृक्षारोपण समिती स्थापन करणे, सामाजिक लेखा परिक्षण समिती, शेतकरी गट, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन समिती, बालसंरक्षण समिती आदी गावहिताच्या व विकासाच्या दृष्टीने पायाभुत सुविधांनीयुक्त स्वयंपुर्ण गाव अशा विविध संकल्पनाचे मार्गदर्शना या शिबीरात देण्यात आली.