यावल, प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन पक्षाच्यावतीने युवा जोडो संपर्क अभियानाला आजपासून पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्या युवक राष्ट्रवादी कॉंग्रेच्या माध्यमातून आयोजित युवा जोडो संपर्क अभियानाला यावलमध्ये फॉर्म भरून सुरवात करण्यात आली. या कर्यक्रमासाठी युवक जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य रविंद्र पाटील तसेच राष्ट्रवादी युवक चे समन्वय तथा या कार्यक्रमाचे निरीक्षक आबा पाटील जिल्ह्याच्यावतीने आले होते. आबा पाटील यांनी संपर्क जोडो अभियान ची माहिती व स्वरूप, कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. जिल्हा युवक अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी संघटना मजबुतीसाठी हे एक महत्वाचा दुआ आहे. आगामी निवडणुकीत या संपर्क अभियानाची मदत होणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात अतुल पाटील यांनी संघटनेचे महत्व सांगून बूथ चे महत्व निवडणूक जिकण्यासाठी किती या विषयावर मार्गदर्शन करून येणाऱ्या निवडणुकीत युवकांच्या माध्यमातुन युवा संपर्क अभियानाची महत्वाची भूमिका राहील, असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केले. त्यात त्यांनी आपल्या पक्षाचे चिन्ह हे घरा -घरापर्यंत पोहचविण्याची नवीन युवकांनी खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील संघटनेत सामील करून घेण्याची या अभिनव युवा जोडो अभियानाची मदत होईल असे सांगितले. या कार्यक्रमात सूत्र संचालन युवक अध्यक्ष ॲड. देवकांत बाजीराव पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार शहर युवक अध्यक्ष हितेश गजरे यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला या आदिवासी आघाडीचे एम बी तडवी, नगरसेवक राकेश कोलते, शहर अध्यक्ष करीम मन्यार, युवक समन्वक, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंन्दे, किशोर पाटील, जिल्हा युवक उपाध्यक्ष दीपक पाटील, कोळी, चंद्रकांत येवले, जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील, प्रशांत पाटील, जितेंद्र सरोदे, विध्यार्थी अध्यक्ष राकेश सोनार, गिरीष पाटील, ललित तेली, राहुल चौधरी, हेमंत फेंगडे, भूषण नेमाडे, भरत पाटील, जमीर पटेल, पवन खर्चे, गाणी खान, महिला अध्यक्ष व्दारका पाटील, शामल भावसार, उज्वला कोळी, हेमंत दांडेकर, रोहित इंधटे, दीपक तडवी आदींसह कार्यक्रमास उपस्थित होते.