यावल प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या ‘किमान आधारभूत किंमत खरेदी योजने’तर्गत यावल तालुक्यात शासकीय भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ रविवार, दि. २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता शासकीय गोदाम, यावल येथे संपन्न होणार आहे.
रावेर यावलचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार लताताई सोनवणे या मान्यवरांच्या उपस्थित रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांचे शुभहस्ते काटापुजन व धान्य पूजनाने भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ होणार आहे.
याप्रसंगी जिल्हा मार्केटिंग अधीकारी, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती तुषार पाटील, उपसभापती उमाकांत पाटील व संचालक मंडळ, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे व पंचायत समितीचे सर्व सदस्य, खरेदी उपाभिकर्ता, विविध कार्यकारी सोसायटी. कोरपावली तालुका यावलचे चेअरमन राकेश फेगडे व संचालक मंडळ, यावल खरेदी विक्री संस्थाचे चेअरमन अमोल भिरूड संचालक मंडळ, सर्व राजकीय पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ व सचिव स्वप्नील सोनवणे आदी उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी शासनाने कोविड 19 संदर्भात निर्देश केलेल्या सर्व नियमाचे सर्वाना उपस्थीत राहावे असे आवाहन महेश पवार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे .