यावल येथे रक्तदान शिबीर

 

 

यावल :  प्रतिनिधी ।  शहरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ , स्वामी विवेकानंद साप्ताहिक मिलन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे रक्तदान शिबीर  व कोविड लसीकरण नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते .

 

या रक्तदान शिबीराप्रसंगी  ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ बी बी  बारेला , पोलीस निरीक्षक  सुधीर पाटील , ग्रामीण रुग्णालयाचे तंत्रज्ञ नानासाहेब घोडके, ऍड राजेश गडे , डॉ अभय रावते, विजयसिंग पाटील , धिरज भोळे यांच्या हस्ते   भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदानास सुरुवात झाली या शिबीरात ३० तरूण रक्तदात्यांनी रक्तदान केले व ५० कोविड लसीकरणाची नोंदणी झाली

 

माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीचे ( जळगाव ) जनसंपर्क अधिकारी अर्जून राठोड , जागृती लोहार , लॅब सहाय्यक रामचंद्र पोतदार, उदय सोनवणे

, रुपेश वारके, सागर चौधरी, ईश्वर चौधरी , हर्षल मोरे  , निलेश बारी, उमाकांत बारी, राजेश श्रावगी , राजेश्वर बारी , ज्ञानेदेव मराठे , अखील भारतीय विद्यार्थी परिषदचे कार्यकर्ते अनिकेत सोरटे, जतीन बारसे हे  उपस्थित होते.

Protected Content