Home Cities यावल यावल येथे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

यावल येथे भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
30

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील भारतीय जनता पार्टी तालुका कार्यालय यावल येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१वी जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.

 

यावल येथील भारतीय जनता पक्षाच्या तालुका संपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस सर्व उपस्धितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , भाजपा शिक्षक आघाडीचे पी. एस. सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपालसिंग पाटील, सरचिटणीस परिस नाईक, भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष बबलू घारू, ललित परमार्थी, सागर मोरे ,सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष स्नेहल फिरके यांच्यासह आदी पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound