यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | काल पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने घवघवीत यश संपादन केले म्हणून आज यावल येथे भाजपच्या वतीने लाडू वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा जवळीत चौकात यावल तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करीत फटाके फोडत व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा परिषदचे माजी आरोग्य सभापती हर्षल पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उजैन्नसिंग राजपूत, भाजपा यावल शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा वड्री ग्रामपंचायतचे सरपंच अजय भालेराव, कोरपावली विकासोचे चेअरमन राकेश फेगडे, यावल पंचायत समिती माजी प्रभारी सभापती दीपक पाटील, व्यंकटेश बारी, युवा मोर्चा यावल तालुकाध्यक्ष सागर कोळी, पी. एस. सोनवणे, परेश नाईक, योगेश चौधरी, बबलू घारु, भुषण फेगडे, शेखर बाविस्कर, अतुल चौधरी, राहुल बारी ,सुरज पाटील, सोहन कोळंबे यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.