यावल येथे दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्तीचे आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज  प्रतिनिधी | प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने यावल पंचायत समितीत उतर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करीत गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

 

आज यावल पंचायत समितीच्या कार्यालयात प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने शासन निर्णयानुसार दिव्यांग पुनर्वसन व विकासाचे अनुषांगाने विविध योजना दिव्यांग बांधवांसाठी जाहीर केल्या आहेत. असे असतांना ही यावल पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या ग्रामपंचायतीवर योजनांची अमलबजावणी करण्यास उदासिनता दाखविण्यात येत असल्याने दिव्यांग बांधवांना कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नसल्याने , दिव्यांग बांधवानां अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

या अनुषंगाने,  दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार अंपग संस्येचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील , जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सैमिरे यांच्या प्रमुख उपस्थित पंचायत समिती , यावलचे कनिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी गजानन रिंधे व सहाय्यक प्रशासन अधिकारी सरवर तडवी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Protected Content