यावल प्रतिनिधी । रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी जाणाऱ्या तरूणाच्या हातातून १२ हजार ४०० रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येवून हिसकावून लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद तौफीक इसहाक कच्छी (वय-२१) रा. डांंगपुरा यावल हा आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शनिवार ८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास यावल शहरातील मनुदेवी मंदीराच्या समोर मोहम्मद कच्छी हा मोबाईलवर मित्राशी बोलत असतांना त्याच्या पाठीमागून अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येवून हातातील १२ हजार ४०० रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून नेला. आरडाओरड केली परंतू चोरटे मोबाईल घेवून पसार झाले होते. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रात्री १० वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.