यावल, प्रतिनिधी । येथे श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक अंतर्गत कृषीशास्त्र विभागाव्दारे मंगळवार २६ जानेवारी रोजी जागतिक कृषी महोत्सव २०२१ सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
यावल बसस्टॅन्डजवळ फैजपुर रोडवरील प्रशांत अॅग्रो, पी. टी. चोपडे सरांच्या शेतात मंगळवारी दि. २६ जानेवारी सकाळी १० ते ४ या वेळेत जागतिक कृषी मोह्त्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामहोत्सवाच्या निमित्ताने आयोजीत या कार्यक्रमात जगभरातील सुमारे ११०० काणी एकदिवसीय कृषीचा जागर होणार आहे. या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बांधावर घेण्यात येणार आहे. यात विशेष उपक्रमम्हणून २२ ते २८ जानेवारी दरम्यान १० ते १५ गावातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारा आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुक्यात विविध ठिकाणी होणाऱ्या एकदिवसीय कृषीचा जागर , शेतकरी व शेतीपुरक कंपन्या यांना जोडणारे प्रभावशाली माध्यम असून या कृषी मेळाव्यात शेतीस पुरक जोड व्यवसाय व प्रक्रीया उद्योगांची माहीती तसेच मार्गदर्शन तसेच देशी व गावराण बियाण्यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी शेतकऱ्यांसाठी कृषी अभ्यासपर शिवार फेरीचे आयोजन त्याचबरोबर प्रयोगशिल शेतकऱ्यांसाठी कृषी माऊली सत्कार तसेच शेतकऱ्यांच्या कुंटुंबातील इच्छुक उपवर वधुंसाठी सुयोग स्थळांची माहीती आणि शेतकऱ्यांसाठीच्या केन्द्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहीती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या एकदिवसीय कृषी मेळाव्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .