यावल प्रतिनिधी । शहरातील माधव नगरात येथे एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटना प्रकाश सोनवणे व वंदना सोनवणे यांच्याहस्ते रविवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले.
आयोजित केलेल्या बालसंस्कार केंद्रा विविध स्पर्धा घेण्यात आल्यात. यात लिंबू चमचा, स्मरणशक्ती विकास स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण, वकृत्व व स्त्रोत व मंत्र पठण असे विविध स्पर्धा घेण्यात आले. यासोबत शिशु संस्कार, गर्भसंस्कार विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सणवार वैकल्यआणि आपल्या १८ विभागांची माहिती या शिबिरात बाल विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व पालकांनी आवर्जून शिबिराला उपस्थिती दिली. ही शिबिर सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत असेल सहभागी केंद्र यावल ,दहिगाव, सातोद ,विरावली, साकळी माधव नगर केंद्रातील अनिता भोईटे ,अश्विनी सावकारे,पुनम पाटील,शितल महाजन हा कार्यक्रम तसेच यावल तालुक्यात फैजपुर. सांगवी. किनगाव, यावल येथे आयोजित केला आहे. या हिवाळी शिबीरास यशस्वी करण्यासाठी बाल संस्कारच्या प्रतिनिधी अनिता भोइटे , तालुका प्रतिनिधी विकास चोपडे , केन्द्र प्रतिनिधी संगीता काटकर व सर्व सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.