यावल : प्रतिनिधी । यावल येथे उद्या महागाईच्या विरोधात मोदी सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे
तालुका व शहर काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, आजी – माजी आमदार , सर्व फ्रंटलचे अध्यक्ष , कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी , सर्व ब्लॉक अध्यक्ष , पदाधिकारी , सहकारी , नगर परिषद , जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्ते सर्वांना काँग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने प्रदेश काँग्रेस कमिटीने देशात घरगुती गॅस , पेट्रोल, डिझेल, इंधन, खाद्यतेल आदी जिवनावश्यक वस्तुंच्या भरमसाठ दरवाढविरोधात आंदोलन कार्यक्रम देण्यात आला आहे
आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार रमेश चौधरी , काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संदीपभैय्या पाटील, जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी यावल शेतकी संघाच्या कार्यालयापासुन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे .
ही सायकल रॅली मेन रोड मार्गाने बुरूज चौक , नगीना चौक , बारीवाडा चौक , गवत बाजार , म्हसोबा मंदीर चौक ते बोरावल गेटपर्यंत व बारी चौक , सोनार गल्ली , सुदर्शन चित्र मंदिर परिसर , सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाकडुन पंचायत समिती येथे समाप्त होणार आहे या सायकल रॅलीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे आणी शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्या तर्फे करण्यात येत आहे.