यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामाच्या भरडधान्य ज्वारी व मका या धान्याची शासकीय किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केंद्राचे शुभारंभ आज सकाळी ११ वाजता चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावल येथील तहसील कार्यालयजवळील सातोद कोळवद मार्गावरील शासकीय गोदामावर पार पडलेल्या या कार्यक्रमात आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते काटा पूजन व धान्य पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी यावलचे तहसीलदार महेश पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, कृउबाचे उपसभापती उमेश पाटील, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक कृषी भुषण नारायण शशीकांत चौधरी, शिवसेने तालुकाप्रमुख रवी सोनवणे, शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख गोटू सोनवणे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बारी संचालक, पप्पू जोशी, अजहर खाटीक, योगेश पाटील, स्वराज फाउंडेशनचे भरत चौधरी, उपतालुका प्रमुख, भारसिंग बारेला, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालीका कांचन फालक, आशिष झुरकाळे, रोहिदास महाजन, विभाग प्रमुख आशिष झुरकाळे, दिनेश साळुंखे, सुधाकर पाटील, कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन तथा कृउबाचे संचालक राकेश फेगडे, भरत चौधरी, सूर्यभान पाटील, समाधान सोनवणे, महेंद्र चौधरी, संतोष महाजन, राष्ट्रवादीचे ललीत पाटील, प्रवीण महाजन, नाना धनगर आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थित होती.