यावल येथे अवैध वाळूची वाहतूक; तीन जणांवर गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । शहरातील फॉरेस्ट नाक्याजवळ असलेल्या परिसरात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरची चौकशी करतांना पोलीसांनी अडविले. परंतू डंपरचालक वाहन न थांबविता वाळूने भरलेले डंपर घेवून पसार झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलिसात  तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहूल चौधरी हे यावल शहरातील फॉरेस्ट नाक्याजवळ शनिवारी रात्री १ वाजता गस्तीवर होते. त्यावेळी पिवळ्या रंगाचे (एमएच १९ झेड ४४४०) क्रमांकाचे वाळूने भरलेले डंपर पोहेकॉ राहूल चौधरी यांना दिले. त्यांनी डंपर जागेवर थांबविण्याचा प्रयत्न केला परंतू डंपर चालक सुरेश उर्फ गोटू विठ्ठल सपकाळे (वय-२६), जितेंद्र विकास पाटील (वय-२६) आणि राजेंद्र रामचंद्र बाविस्कर (वय-१९) तिघे रा. करंज ता. जळगाव यांनी डंपर न थांबविता भरधाव वेगाने वाळूने भरलेले डंपर पळवून नेले. पोलीस कॉन्स्टेबल राहूल चौधरी यांच्या फिर्यादीवरून तीन जणांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक युनुस तडवी करीत आहे.

Protected Content