यावल प्रतिनिधी । शहरातील साने गुरूजी माध्यमिक विद्यालय, शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय, बालसंस्कार माध्यमिक विद्यालय, मुलींचे विकास विद्यालय, इंदिरा गांधी उर्दू हायस्कूल या शाळांचा निकाल लागला.
येथील नगरपरिषद यावल व्दारे संचलीत साने गुरूजी माध्य शाळेचा निकाल ८४.२० टक्के लागला असून रिजवान रमजान पटेल या विध्यार्थ्याने ९४.४ टक्के गुण मीळवून शहरातून प्रथम श्रेणीत मान मीळविला आहे. पवन ज्ञानेश्श्वर सोनवणे याने ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयातून व्दितीय क्रमांकाने उत्तीण झाला आहे. युगंधरा अजय शिंदे या विद्यार्थ्यांनी ९१.४ टक्के गुण मीळवून विद्यालयातून तृतीय क्रमाकाने उत्तीर्ण झाली आहे. यशस्वी विध्यार्थ्यांचे नगराध्यक्षा नौशाद तडवी, शालेय समिती चेअरमन अतुल पाटील यांचेसह मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले आहे.
शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय, यावल च्या कन्या शाळेचा निकाल 87.69 टक्के लागला असुन वैशाली दयाराम जयकारे गुण हीने 92 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे तर तेजश्री अनिल पाटील गुण 91.4 टक्के ही दुसक्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तृतीय क्रमांक कीर्ती तेजपाल पाटील हीने 91.2 टक्के गुण मीळविले असून .स्नेहल निलेश बडगुजर 90 टक्के गुण मीळविले आहे. उत्तीर्ण विद्यार्थिनींचे चेअरमन, अध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका यांनी अभिनंदन केले.
शहरातील बाल संस्कार माध्यमिक विद्यालय यावल
येथील बालसंस्कार माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम क्रमांकाने कु.भाग्यश्री गोविंद वाणी ९१.८० टक्के,द्वितीय – अभिराम दिलीप बुरुजवाले ९१.६० टक्के,तृतीय- ऐश्वर्या महेश यावलकर ८९.६० टक्के गुण मिळवुन उत्तीर्ण झाले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष महेश वाणी, संचालक वर्ग, मुख्याध्यापक अतुल गर्गे यांनी अभिनंदन केले .
मुलींचे विकास विद्यालय यावल
याळेच निकाल ९७ टक्के लागला असून तनुजा जितेंद्र देशमुख व ममता बाळकृष्ण महाजन या दोघींनी ८१.६० टक्के गुण मीळवून प्रथम आल्या आहेत. डॉ. झाकीर हुसेन उर्दु हायस्कुलचा निकाल ९२.५७ टक्के निकाल लागला असून नाजीया राजु पटेल या विद्यार्थींनीने ९१.६० टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आली आहे. तर अफसार युनुस तडवी याने ९०.४ टक्के गुण मीळवून व्दितीय क्रमांक तर मोईज अहमद खान खलीलखान याने ८९.४0 टक्के गुण मीळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
इंदिरा गांधी उर्दु गर्ल्स हायस्कुल यावल
शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून सै.महवेश आशिक हुसेन हीने ९१.४० टक्के, व्दितीय नेहरीन फातेमा गुलाम गौस खान हिने ८९.८० टक्के तर तृतीय क्रमांकाने महेबीन असलमखान ८९.६० टक्के गुण मीळविले आहे. चेअरमन हाजी शेख ताहेर शेख चांद व सर्व संचालक मंडळाने तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी दहावीच्या शालांत परिक्षेत घवधवित यश स्पादन केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.