Home Cities यावल यावल येथील विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता

यावल येथील विवाहिता राहत्या घरातून बेपत्ता


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बाबुजीपुरा परिसरात राहणारी विवाहीत तरूणी ही कुणास काही एक न सांगता घरातुन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अशी की, शहरातील बाबुजीपुरा परिसरात राहणारी २३ वर्षीय विवाहिता ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, मंगळवारी २७ डिसेंबर रोजी घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. विवाहितेचा तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवारी २८ डिसेंबर रोजी पती इम्रान शेख (वय-३६) यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात हरविल्याची नेांद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्यासह पोलीस करीत आहे .


Protected Content

Play sound