यावल येथील प्रल्हाद पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

यावल (प्रतिनिधी )| येथील शहरातील बोरावल गेट परिसरात रहिवाशी प्रल्हाद दिनकर पाटील (वय ५६) यांचे शुक्रवार २८ जून रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तिन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा बोरावल गेट परिसरातील त्यांच्या राहते घरापासून दिनांक आज शनिवार 29 रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे. ते ऑर्डन्स फॅक्टरी वरणगाव मधील सेवानिवृत्त कर्मचारी दिनकर पाटील यांचे बंधू होत.

Protected Content