यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाच्या वतीने पेट्रोल पंपांवर अनावश्यक मोटर वाहनांचे होणारे गोंधळ टाळण्यासाठी शासकीय पातळीवर देण्यात आलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी बैठक बोलावली होती.
यावल तहसील कार्यालयात आज सकाळी ११ वाजता तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी सर्वप्रथम मालकांची तातडीची बैठक बोलावली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेले असताना मात्र तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपावर यासंदर्भात शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसून येत नसल्यामुळे आज यावरचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी चालकांची तातडीची बैठक घेतली. राज्य शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालयाने २४ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधक उपाय याची सविस्तर माहिती दिली. आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या यात परिवहन आयटी कार्यालयात वतीने विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधीशी बैठक घेऊन कोरूना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेच्या पुरवठा पुरेशा प्रमाणात होण्यासाठी याकामी वापरण्यात येणाऱ्या सर्व मालवाहू वाहनांना विनाअडथळा वाहतूक करता यावी म्हणून प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश जारी केले आहे.
अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र संबंधित प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथून देण्यात यावे असे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यालयामार्फत कार्यालयाच्या स्तरावर योग्य ती पावले उचलून आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी सूचना तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी तालुक्यातील सर्व पंप चालकांना दिलेली आहे. यावेळी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार व तहसीलदार एम.एच. कडवी हे उपस्थित होते.