Home धर्म-समाज यावल येथील पटेल स्कूलमध्ये आळस व अहंकाराची विद्यार्थ्यांनी केली होळी

यावल येथील पटेल स्कूलमध्ये आळस व अहंकाराची विद्यार्थ्यांनी केली होळी


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये स्कुलच्या वतीने अंहकार, आळस, बुराई, ईर्ष्या रूपी प्रतिकात्मक होळी करून सणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

 

सर्वात प्रथम शाळेत होळीची सजावट करण्यात आली.तिलोतमा शेलेन्द्र महाजन यांनी सर्व विद्यार्थ्यांना होळीचे महत्त्व समजावून सांगीतले. त्यानंतर स्कुलच्या मुख्याध्यापिका शिला तायडे व सर्व शिक्षकवृंद व विदयार्थी तसेच कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत प्रविणा पाचपांडे यांनी स्कुलच्या कृष्णतारा नगर मधील परिसरातील मैदानावर होळीची पूजा केली व होळी पेटवण्यात आली.

 

सर्व विद्यार्थी अत्यंत उत्साहित व आनंदित होते तसेच सर्व विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करीत आजचा होळीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा केला. यावेळी श्री मनुदेवी आदीवासी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार प्रशांत फेगडे सह सर्व शिक्षक वर्गाचे व कर्मचारी वर्गाचे या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले . याप्रसंगी स्कुलचे विद्यार्थी मोठया उत्साहाने या होळी कार्यक्रमात सहभागी झाले. अशा प्रकारे स्कूलच्या परिसरास आजचा होळीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला.


Protected Content

Play sound