Home Cities यावल यावल येथील पटेल इंग्लीश स्कूलमध्ये शिवरायांना मानवंदना

यावल येथील पटेल इंग्लीश स्कूलमध्ये शिवरायांना मानवंदना


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळाव्दारे संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

या निमित्ताने अखंड महाराष्ट्र आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे जनक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती शाळेच्या आवारात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमात सर्व प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येवून भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमास मुख्याध्यापिका शिला तायडे, प्रशांत फेगडे यांच्यासह तृप्ती पवार, प्रवीणा पाचपांडे, सोनाली वाणी, कामिनी बोंडे, तिलोत्तमा महाजन, श्रद्धा साळुंके, टिना निंबाळे, धनश्री महाजन, कुसुम फालक, मीनाक्षी वारके, योगेश तळेले इत्यादी कर्मचारी वर्ग यांच्यासह मोठया संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound