यावल येथील डॉ.वैशाली कोष्टी यांना पीएच.डी. प्रदान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाच्या डॉ. वैशाली कोष्टी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. वैशाली कोष्टी यांचा जळगाव जिल्ह्यातील इंदिरा आवास योजनेचा अभ्यास (कालखंड सन२००५ ते २०१५ ) हा विषय होता त्यांना जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. एस. डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या वैशाली कोष्टी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील उपप्राचार्य ए. पी. पाटील, उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी व्ही पावरा, डॉ. निर्मला पवार, डॉ. संतोष जाधव, प्रा. भारती सोनवणे, प्रा. मयूर सोनवणे, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. गणेश जाधव, प्रा सुभाष कामडी, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे आदींनी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Protected Content