Home Cities यावल यावल येथील डॉ. कापडे यांना पीएचडीची गाईडशिप

यावल येथील डॉ. कापडे यांना पीएचडीची गाईडशिप


ayub patel

यावल (प्रतिनिधी) । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.पी. कापडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मार्फत इंग्रजी विषयाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली.

डॉ.एस.पी. कापडे हे विद्यापीठांतर्गत एम.फिल. आणि पी.एचडी.च्या संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करू शकणार आहे. डॉ.कापडे यांना 31 वर्ष पदवी अभ्यासक्रमांना शिकवण्याचा अनुभव आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल प्राचार्या डॉ.सौ.संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा.एम.डी. खैरनार, उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


Protected Content

Play sound