यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आत्तापर्यंत रूग्णांची संख्या ७२ वर पोहचली आहे. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वपक्षिय आजपासून तीन दिवसासाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
आठवडे बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा
सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आलेले असतांना नगरपरिषदच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी शुक्रवार हा आठवडे बाजारचा दिवस असल्याने भाजीपाला व अन्य साहीत्य विक्रीची दुकाने लावण्यात आली होती. मात्र या ठिकाणी गर्दी करणाऱ्या नागरीकांमध्ये कुठल्याही प्रकारचे कोरोना संसर्गाचे गांभीर्य दिसुन येत नसल्याचे आढळुन आल्याने सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.
शहरात प्रतिबंधित क्षेत्रात वाढ
यावल शहरातील सुदर्शन चित्र मंदीर परिसर, पुर्णवाद नगर, तिरुपती नगर, जिनिंग प्रेस व्यापारी संकुल, खाटीक वाडा, सिद्धार्थनगर, आयडीबीआय बँक परिसर, वाणी गल्ली, बडगुजर वाडा, बाबुजीपुरा, मेन रोड वसुले गल्ली, कोलते वाडा, सार्वजनिक वाचनालय, मेन रोड जुनी बोहरा गल्ली, प्रभु लिला नगर, अक्सा नगर या क्षेत्रात मागील काही दिवसापासुन एका मागे एक अशा प्रकारे कोरोना बाधीत झालेले रुग्ण आढळुन आल्याने ही सर्व क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.
कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा आज हिंगोंणा गावात एक व काल न्हावी गावात एक बाधीत रुग्ण मिळुन आल्याने रुग्णांचा आकडा ७२ वर जावुन पहोचला आहे असुन जवळपास ७५ जणांचे अद्याप स्वॅब चाचणी अहवाल येणे बाकी आहे कोरोना बाधीत मरण पावलेल्या रुग्णांचा आकडा देखील ८ वर पोहचला आहे. ही बाब आरोग्य यंत्रणे करिता अत्यंत चिंतेची असुन विभागाचे प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जितेंद्र कुंवर, पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा महाजन आणि यावल व फैजपुर नगर परिषद यंत्रणा या सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवुन आहे.
नागरीकांनी शासनाने दिलेल्या लॉक डाऊन काळासाठीच्या आदेशाचे शिस्तीने काटेकोर पालन करावे असे वारंवार आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असुन यावल शहरात आजपासून ते १५ जून पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. या जनता कर्फ्यूला व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवावीत आणी नागरीकांनी कुठलेही अतिमहत्वाच्या कामाशिवाय घरा बाहेर फिरू नये, असे आवाहन यावल शहर व्यापारी संघ, नगर परिषद लोकप्रतिनिधी व विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजीक कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.