यावल, प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन गोकुळ पाटील यांनी सदिच्छा भेट दिली असता श्री. पाटील यांचा प्र प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी सत्कार केला.
चेअरमन गोकुळ पाटील यांच्याशी प्राचार्यांनी महाविद्यालयातील विविध प्रश्नाविषयी सविस्तर चर्चा केली. गोकुळ पाटील यांनी यावेळी आपल्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ व भौतिक सुविधा वाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांची तात्काळ दखल घेत संस्थेकडून पूर्णपणे सहकार्य देण्याचे यावेळी आश्वासन दिले. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक जयवंतराव येवले, संचालक महेंद्र भोईटे, संचालक सुनील भोईटे व भाऊसाहेब प्रमोद काळे आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. यास्वागत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार तर आभार डॉ. सुधा खराटे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, संजय पाटील यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.