यावल महाविद्यालयात स्त्रियांवरीत अत्याचाराचा निषेध

yawalcollege

यावल प्रतिनिधी । यावल महाविद्यालयातर्फे वर्तमान स्थितीत महाराष्ट्रात घडलेल्या हिंगणघाट, औरंगाबाद व सिल्लोड येथे महिलांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा व क्रूरतेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील, प्रा.एम.डी.खैरनार, प्रा.संजय पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठया प्रमाणावर या श्रद्धांजलीच्या सभेस उपस्थित होते. या घटनेला जबाबदार नराधम आरोपींना तात्काळ कडक शासन व्हावे अशा भावना देखील उस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली.

Protected Content