यावल, प्रतिनिधी । तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानास राबविण्यात येत आहे. पक्षाने तालुक्यात विविध विधायक आणि समाजपयोगी नागरी समस्या यात अग्रभागी राहुन प्रश्न मांडल्याने पक्षास सदस्य नोंदणीस सर्व स्तरावरून नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १५ व्या वर्धापन दिनापासुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला आहे. या सदस्य नोंदणीस ग्रामीण भागातील तरुणांनी सदस्य नोंदणीचा फॉर्म तालुक्यातुन सुमारे ३०० युवकांनी तसेच विविध क्षेत्रातील पदाविधर युवकांनी ऑनलाईन फार्म भरून स्वतः नोंदणी करून घेतली आहे. सुमारे शंभर जणांनी ऑफलाईन सदस्य नोंदणीत आपला सहभाग नोंदवला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानात जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, अजय तायडे, विभागाध्यक्ष आबीद कच्छी, गौरव कोळी, सचिन बारी यांनी सहभाग घेवुन उपस्थित राहुन अभियान याश्वितेसाठी प्रयत्न करत आहेत.