यावल, प्रातिनिधी | येथील प्रगतीशील शेतकरी व युवा सामाजिक कार्यकर्त निलेश सुरेश गडे यांची भारतीय जनता पक्षाच्या यावल शहराध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज (दि.२२) सकाळी पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी व यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक हिरालाल व्यंकट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या भाजपाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष पदाकरीता सौ. विद्या सुर्यकांत पाटील, बबलु धारू, गोपाळसिंग पाटील, रितेश बारी यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निलेश गडे यांची निवड बिनविरोध झाली.
या बैठकीत भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, जिल्हा सरचिटणीस उज्जैनसिंग राजपुत, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, माजी शहराध्यक्ष बाळु हेमराजे फेगडे यांच्यासह अन्य पक्ष पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी निलेश गडे यांना माजी आमदार हरीभाऊ जावळे यांच्यासह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभीनंदन केले.