यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन मातब्बर उमेदवारांचे अर्ज अवैध जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
संपुर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष वेधणार्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३० एप्रिल रोजी होणार्या १८ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकी साठी दाखल असलेल्या १४४ उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी केली असता ०३ उमेदवारी अर्ज अवैध झाले आहेत त्यात विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अट्रावल येथील राहणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन व्यकंट चौधरी , किनगावचे यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील असे दोन आणी न्हावीचे तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक ग्रामपंचायत मतदार संघातून सुनिल फिरके यांचा एक अर्ज असे तीन अर्ज अवैध झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीतुन या तिघ कॉंग्रेसचे मातब्बर उमेदवारी अवैध ठरल्याने राजकीय वर्तृळात एकच चर्चेचा विषय बनला आहे .
आता यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची संख्या १४१ इतकी आहे. दिनांक २०एप्रील रोजी हा उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस असुन दिनांक २१ एप्रील रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप आणी उमेदवारांची अंतीम यादीचे प्रकाशन करण्यात येणार आहे . दिनांक ३०एप्रिल रविवार रोजी मतदान होणार आहे . या निवडणुकी संदर्भातील माहिती यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एम. चव्हाण यांनी पत्रकारांना दिली आहे.