यावल, प्रतिनिधी । येथील पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांना कोरोनाची लागण झाली असून दोन दिवसापुर्वीच्या घेण्यात आलेल्या त्यांच्या स्वॅब चाचणी अहवाल हा पॉझीटीव्ह आलाआहे. त्यांना उपचारार्थ न्हावी येथील कोवीड सेन्टरला पाठविण्यात आले आहे.
मागील ७ महीन्यापासुन यावल पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक म्हणुन रुजु झालेले अरूण काशीनाथ धनवडे यांनी आपल्या अल्पावधी काळात यावल तालुक्यात कार्य करीत असतांना कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर अधिकारी म्हणुन आपली जन सामान्यापर्यंत आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना विषाणु संसर्गाच्या काळात त्यांनी कोरोनाचा संसर्ग वाढु नये याकरीता त्यांनी अनेक कठोर निर्णय देखील घेतले. लॉकडाऊनच्या काळात शासनाच्या नियमांची अमलबजावणीची शिस्त लावण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे. पोलीस निरीक्षक धनवडे यांना मागील चार पाच दिवसापासुन अस्वस्थ वाटु लागल्याने त्यांनी काळजीपुर्वक आपली व आपल्या कुटुंबाची स्वॅब चाचणी तपासणी करून घेतली. यात त्यांच्या कुटुंबातीत इतरांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला तर पोलीस निरिक्षक धनवडे यांचे चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांना पुढील उपचारार्थ न्हावी येथील कोवीड सेन्टर मध्ये दाखल केले आहे. .