यावल प्रतिनिधी । महाआवास अभियान अंतर्गत ग्रामीण पातळीवरील ई-गृहप्रवेश कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थित यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला.
ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्राम विकास विभाग मार्फत पुढील शंभर दिवसात राबवण्यात येणाऱ्या महा आवास अभियानाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८.८2 लाख घरकुलाची निर्मिती करण्याचा निर्धार करण्यात आला. सर्वांनी एकत्रित सहभागातून अभियान यशस्वी करावे, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे
ग्रामीण भागात ‘महाआवास’ अभियानातून घरकुल आवास अभियान- ग्रामीण’ अभियान राबविण राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून नोव्हेंबर 2020 ते 28 नोंव्हेबर 2021 या कालावधीत शंभर दिवसीय ‘महा आवास अभियान- ग्रामीण’ अभियान संपुर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांनी येत्या १०० दिवसात १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण करावे. ‘महा आवास’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण घरकुल निर्मितीला गती द्यावी आणि आपल्या क्षेत्रातील विभागाला प्रथम क्रमांकावर आणावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तालुक्यातील स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना केले. याप्रसंगी यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजित चौधरी, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील, राज्य परिषद संघाचे जिल्हा अध्यक्ष सरपंच पुरोजित चौधरी, ई-गृहप्रवेश कार्यक्रम अझरुददीन फारुकी ग्रमिण गृह अभियंता, किरण सपकाळ (ग्रमिण अभियंता), घरकुल विभागाचे संगणक संचालक मिलींद कुरकुरे, जावेद तडवी, अक्षय शिरसाडे, रौनक तडवी आदी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.