यावल नगर परिषद १४ व्या वित्त आयोग अंतर्गत एक हजार वृक्षांची करणार लागवड

 

यावल, प्रतिनिधी ।  यावल नगर परिषदच्या वतीने शहरात विविध ठीकाणी १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आज रविवार ३१ जानेवारी रोजी चक्रधर नगर परिसरातून वृक्षरोपण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

नगर परिषदच्या माध्यमातुन १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन शहरातील चक्रधर नगर या परिसरात वृक्षरोपण कार्यक्रमाची सुरुवात प्रसंगी नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते यांच्यासह नगर परिषदेचे शिवानंद कानडे, नगर परिषदचे कनिष्ठ अभीयंता योगेश मदने, रमाकांत मोरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. आज दिनांक ३१ जानेवारीस याच कार्यक्रमाअंतर्गत विस्तारीत वसाहतीतील कार्यक्षेत्रातील आयशा नगर या ठीकाणी नगर परिषदच्या माध्यमातुन विविध वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले. यावल नगर परिषदच्या वतीने शहरात विविध ठीकाणी १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आज ३१ जानेवारी रोजी शहरातील विस्तारीत भागातील आयशा नगर कॉलनी आणि विविध ठीकाणी रस्त्याच्या कडेला विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी नगर परिषदचे कनिष्ठ अभीयंता योगेश मदने, वसंत कुमार , सामाजीक कार्यकर्ते अशफाक शाह , हाफीज खान , इसरार खान,नुरोद्दीन शेख , सुलेमान सर , रईस खान सर यांच्यासह या परिसरातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते .

Protected Content