यावल नगर परिषदेकडून विस्तारीत वसाहतीतील पाच कोटीच्या जलकुंभाचे काम पुर्णत्वास — अतुल पाटील

 

  यावल  :  प्रतिनिधी  । येथील नगर परिषदेच्या विस्तारीत क्षेत्रातील प्रभागामध्ये  ५ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या जलकुंभ व पाईपलाईनीने पाणीपुरवठा करणारी  योजना आता पुर्णत्वास आली आहे १ एप्रीलपासुन नवीन नळजोडणी नागरीकांना पाणी वितरणासाठी  करता येणार असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली 

 

. यावल नगर परिषदेच्या माध्यमातुन मागील वर्षी तत्कालीन नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्या अथक प्रयत्नातुन शहरातील विस्तारीत क्षेत्रातील भविष्यात भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा  गांभीर्याने विचार करून या योजनेतुन नवीन १० लक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ सुमारे ७५ लक्ष रुपयांचे निधी उभारणीसाठी व सुमारे ३ कोटीच्यावर निधी पाईपलाईन व  अन्य  कामासाठी राज्य सरकारकडून उपलब्ध करून  घेण्यात आला होता

 

अखेर या जलकुंभातुन पाणी वितरण करण्यासाठी आवश्यक  पाईपलाईनचे काम पूर्णत्वास पोहचले असुन , या पाईपलाईनवरून  परिसरातील सुमारे २७ वसाहतींना पुर्ण दाबाचा स्वच्छ पाणीपुरवठा नळाव्दारे मिळणार आहे  विस्तारीत क्षेत्रातील  नागरीकांना १ एप्रीलपासुन या पाईपलाईनवरून नवीन जोडणीच्या कामास सुरुवात होत आहे

 

. दरम्यान या जलकुंभाव्दारे होणाऱ्या पाणीपुरवठयाचा जुन्या सुमारे सातशे नळधारकांना कुठल्याही प्रकारची आर्थिक त्रास होणार  नसुन त्यांना या नवीन पाईप लाईनीतुन नळजोडणी करीता कोणताही खर्च लागणार नाही  या नियोजनास कालच जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे .येत्या महीन्याभराच्या आत संपुर्ण परिसराला नवीन जलकुंभावरून पाणी पुरवठा होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी म्हटले आहे .

 

दरम्यान जवळपास तिन वर्षाच्या कार्यकाळातील परिश्रमातुन आपणास या पाणीपुरवठा योजनेस पुर्णत्वास नेल्याचे   आत्मीक समाधान असल्याचे सांगुन आपण नागरीकांना दिलेला शब्द पाळल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले .

Protected Content