यावल तालुक्यात ३० सरपंचपदे महीलासाठी आरक्षित

:

यावल : प्रतिनिधी । तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महीला व युवकांनी मोठे यश संपादन केले आज तहसील कार्यालय नवीन प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात महीला सरपंच आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली ३० ग्रामपंचायतींच्या सरपंच आता महिला होणार आहेत

यावेळी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग , तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार आर .डी .पाटील, जमीनी महसुलचे लिपीक दिपक भुतेकर , सुयोग पाटील उपस्थित होते .

महिलांच्या ५० टक्के आरक्षणानुसार तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीवर पुढील पाच वर्ष सरपंच म्हणुन महिलाराज येणार आहे अनुसुचित जातीसाठीचे महीला सरपंचपदाचे आरक्षण मनवेल, शिरागड , कासवे आणी वड्री खुर्द या ४ गावांसाठी जाहीर झाले , अनुसुचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षणात १२ गावांचा समावेश असुन कासारखेडा, नायगाव, डांभुर्णी , आमोदे,सातोद, विरावली, किनगाव खुर्द , निमगाव , हिंगोणे , चिखली खुर्द , महेलखेडी , शिरसाड अशी ही १२ गवे आहेत , नागरीकांच्या प्रवर्गासाठी राजोरे, सांगवी खुर्द, मोहराळे , थोरगव्हाण,पाडळसे, पिळोदे खुर्द , किनगाव बु आणी सावखेडा सिम ही ८ गावे आरक्षित झाली आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी सात महीला सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले असुन यात टाकरखेडा , बोराळे , बोरावल बु , पिपंरूड, हंबर्डी , भालशिव, पिळोदे बु या गावातील सरपंचपद समाविष्ठ आहे

Protected Content