यावल तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री : किरकोळ कारवाईचा आरोप

 

 

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी  गुटख्याची सर्रास विक्री होत असून अन्न व भेसळ प्रतिबंधक विभाग केवळ तुरळक कारवाई करत असून बड्या माशांना अभय देत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश कडू महाजन यांनी केला आहे.

 तालुक्यात परप्रातांतुन आयात होणाऱ्या गुटक्याची मोठया प्रमाणावर सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी  विक्री होतांना दिसुन येत असुन , मागील महीन्यात अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाने केलेली तुरळक स्वरूपाची देखाव्याची कारवाई करून काढता पाय घेतला असुन , गुटका विक्रीतील मोठे मासे मात्र अद्याप ही कारवाई पासुन लांबच असल्याचे दिसुन येत असल्याचे सामाजीक कार्यकर्त राजेश कडु महाजन यांनी म्हटले आहे. 

दरम्यान या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्याला पुर्व आणि  पश्चिम या दोघ दिशेला मध्यप्रदेश व गुजरात राज्यांच्या सिमा आहेत.  या दोघा सिमेवरून चोरटया मार्गाने चारचाकी वाहन तथा एसटी बसेसव्दारे लाखो रुपयांचा गुटखा  पुडीची मोठया प्रमाणावर आयात करण्यात येत आहे.  या मार्गाने गुटखा  आल्यावर तालुक्यात विविध ठिकाणी गुटखा माफीयाच्या माध्यमातुन शिताफी वेगवेगळ्या मार्गाने पाठवण्यात येते . एका माहीतगारानुसार यावल तालुक्यातील यावल शहर आणि  फैजपुर शहर या दोघ मोठया शहरामध्ये महीन्याला सुमारे १o ते १५ लाख रुपयांचा गुटखा विक्री होत आहे. तालुक्यातील सुज्ञ नागरीकांच्या माहीतीनुसार अशा प्रकारे यावल तालुक्यात गुटखा  विक्रीला जात आहे याची माहिती संबधीत विभागास असतांना देखील आपल्या आर्थिक स्वार्थापोटी ती अधिकारी मंडळी कारवाई करण्यास पुढे येत नसल्याची माहीती समोर आली आहे . दरम्यान वाढत्या किमतीत लगेच मिळणाऱ्या गुटख्याच्या व्यसनास अल्पवयीन मुल देखील बळी पडत आहे . सर्वाच्च न्यायलयाच्या आदेशाला न जुमानता होणाऱ्या या गुटखा विक्रीस संबंधीत विभागाने तात्काळ बंदी घालुन या मागचा मुख्य गुटखा  सम्राट कोण याचा शोध घेवुन कारवाई केल्यास गुटखा  विक्रीस प्रतिबंधीत करता येईल.

मागील महीन्यात अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली किरकोळ गुटखा विक्रेत्यावर केलेली थातुरमातुर कारवाई म्हणजे चोर  सोडुन संन्याशाला फाशी अशी चर्चा सर्वत्र होतांना दिसत आहे.  दरम्यान जिल्ह्यातुन इतत्र ठिकाणी  विविध इतर पथकांच्या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा  हस्तगत होतो आणि  यावल तालुक्यात केवळ  चार ते पाच हजारांचा गुटखा कसा  मिळतो असा प्रश्न  यावल तालुक्यात  सर्वसामान्य नागरीकांनी व सामाजीक कार्यकर्ते राजेश कडु महाजन उपस्थित केला आहे.

 

Protected Content