यावल प्रतिनिधी । तालुक्यासह परिसरात बेकायदेशीर व अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. त्यामुळे शासनाचा मोठा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. याकडे तालुका प्रशासनाने तत्काळ दाखल घेवून वाळू वाहतूकदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी तालुकावाशियांकडून होत आहे.
यावल तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या व मोठी असलेली गावे हिंगोणा, भालोद, न्हावी या गावातून मागील अनेक दिवसापासुन मध्यरात्रीच्या वेळेस विनापरवाना जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात खोदकाम करून ट्रॅक्टरमध्ये अनधिकृत वाळूची वाहतूक केली जात आहे. या संपुर्ण परिसरात हा बेकाद्याशीर धंदा मोठया जोमाने सुरू असुन, या गावात सुरू असलेली खाजगी ईमारतीच्या लाखो रुपयांच्या बांधकामांवरही याच मार्गाने मिळणारी वाळू खुलेआम वापरली जात आहे. या सर्व प्रकाराकडे स्थानिक महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे निसर्ग प्रेमीकडुन बोलले जात आहे. सदरच्या बेकाद्याशीर वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबत किमान महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून साधी चौकशी देखील केली जात नसल्याचे दिसून येत आहे. या अनधिकृत गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याचे ते चांगलेच मस्तावले असल्याचे चित्रदिसून येत आहे. येथील नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे खो पाडण्यात येतात. त्यातून मातीची मोठी वाहतूक केली जाते. हिंगोणा गावातील
या अनधिकृत गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी चार ते पाच ट्रॅक्टर लावण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवरची वाहनधारक मंडळी यात सहभागी आहेत. यामुळे हा धंदा राजरोसपणे सुरु आहे. हा परिसर भालोद महसूल मंडळाच्या नियंत्रणात येतो. त्यामुळेयाकडे गांभीयनि लक्ष देऊन अनधिकृत: वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याची गरज आहे.