यावल प्रतिनिधी । तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशान्वये आरक्षण निहाय प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याचे वृत्त तहसील प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळाची मुदतही सप्टेबर व डीसेंबर २०२० मध्ये संपत आहेत. कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय या दृष्टीकोणातुन हया निवडणूका होणार नसल्याने आणि राज्यातील महाविकासआघाडी शासनाच्या काढलेल्या नविन आदेशान्वये या ग्रामपंचायतीवर पुढील निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर होईपर्यंत गावातील मतदारांमधमनच योग्य प्रशासकाची निवड करण्याचे ठरले असल्याने प्रशासकपदासाठी गावातील ग्रामपंचायतींवर कोणाची निवड होते याकडे ग्रामस्थांचे व विशेष करून उच्च शिक्षित युवकांचे लक्ष या नियुक्ती कडे लागुन आहे.
तहसीलदर जितेंद्र कुवर यांनी दिलेल्या माहीतीनुसार सप्प्टेबर २० मध्ये मुदती संपणा-या ग्रामपंचायतींमध्ये मनवेल, महेलखेडी, हिंगोणे, डोंगरकठोरे, सांगवी बुद्रुक, मोहराळे, अट्रावल, निमगाव, सावखेडासीम, वढेोदे प्र. सावदा, अंजाळे, दुसखेडा, सांगवी खुर्द, उंटावद, पिंपरुड, कोळवद, कोसगाव, नावरे, बोरखेडा बुद्रुक, आडगाव, डोणगाव, सातोद, हंबर्डी, बामनोद, कोरपावली, विरोदा, चिंोली, मारुळ, वढोदे प्र. यावल, दहीगाव, टाकरखेडा, नायगाव, शिरसाड, भालोद, भालशिव, पिप्री, बोरावल बुद्रुक या गावांचा समावेश असुन , डीसेंबर २० मध्ये संपणा-या ग्रामपंचायती डांभुर्णी, आमोदा, बोरावल खुर्द, वनोली , विरावली, वड्री खुर्द,किनगाव बु., कासवे,पिळोदे खुर्द, राजोरा या ग्रामपंचायतींचा यात समावेष असणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतच्या प्रशासक पदावर आरक्षण निहाय प्रशासकाची नियुक्ती होणार असल्याचे वृत प्राप्त झाले आहे .