यावल प्रतिनिधी । तालुक्यात अनेक वर्षापासुन अत्यंत नादुरुस्त व कालबाह्य झालेल्या कालीपिली वाहनांनी धुमाकुळ माजवुन सोडला असुन, भुसावळ-यावल, यावल-फैजपुर व इतर ठीकाणी या प्रवाशी वाहतुक करणाऱ्या वाहनांचे अपघात होवुन यात अनेक निरपराध नागरीकांचे बळी गेले असुन, या गंभीर प्रश्नाकडे राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने तात्काळ दखल घेवुन या वाहनांवर बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
याबाबतचे वृत असे की, यावल शहर व तालुक्यातुन काही ठीकाणी मागील काही वर्षांपासुन यावल ते भुसावळ, यावल ते फैजपुर व काही भागात सुमारे दोनशेच्या वर कालबाह्य झालेली तुटक्या स्वरूपाची नादुरूस्त वाहने अवैध मार्गने सर्व नियम धाब्यावर ठेवुन प्रवासी वाहतुक करीत असुन, अशा प्रकारे प्रवासी वाहतुक करतांना अनेक वेळी या अपघात होवुन या आघातात अनेक निरपराध लोकांनी आपले जिव गमवावे लागले आहे.
विशेष म्हणजे अशा प्रकारची प्रवासी वाहतुक करणारी कालबाह्य झालेली काली पिली वाहनेही संपुर्ण जळगाव जिल्ह्यात यावल, फैजपुर, रावेर याच विभागातच राजरोसपणे वाटेल तेवढे प्रवासी वाहनात भरून वाहतुक करतांना दिसुन येतात. हा सर्व प्रकार राज्य प्रादेशिक परिवहन विभाग आणि स्थानिक पोलीसांच्या आर्थिक स्वार्थापोटी संगनमताने सुरू असल्याची नागरीकांची ओरड आहे. या सर्व कालबाह्य झालेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासना तात्काळ वेळीच दखल घेवुन या कालबाह्य झालेल्या वाहनांवर बंदी घातल्यास संभाव्य होणाऱ्या आपघातातुन तरी काही लोकांचे प्राण वाचतील हे मात्र सत्य आहे.