Home धर्म-समाज यावल तहसील कार्यालयात ध्वजारोहण

यावल तहसील कार्यालयात ध्वजारोहण


यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय ईमारतीच्या प्रांगणावर आज भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय धव्जारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी माझी वसुंधरा या कार्यक्रमाअंतर्गत भारतीय संविधानाची सामुहीक शपथ घेतली.

२६ जानेवारी २०२१ रोजी यावल येथील तहसीलच्या नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या ईमारतीच्या प्रांगणावर सकाळी ९.१५ मिनिटानी भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसीलदार महेश पवार यांच्याहस्ते राष्ट्रीय ध्वजाचे धव्जारोहण करण्यात आले तर पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. यावेळी यावल तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी वर्ग यांच्यासह माजी आमदार रमेश चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवीन्द्र सोनवणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण चौधरी, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहाँगीर तडवी, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, यावल नगरपरिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजीक कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील मंडळी मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.


Protected Content

Play sound