Home धर्म-समाज यावल ग्रामीण रुग्णालयाचे औषधनिर्माण अधिकारी सुर्यकांत पाटील यांचे निधन

यावल ग्रामीण रुग्णालयाचे औषधनिर्माण अधिकारी सुर्यकांत पाटील यांचे निधन

0
45

 

यावल,  प्रतिनिधी ।  तालुक्यातील सातोद येथील रहिवासी व यावल ग्रामीण रुग्णालयात नगर परिषदचे मुख्य औषधनिर्माण अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सुर्यकांत धरमसिंग पाटील (वय ५६ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

सुर्यकांत पाटील  हे जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात मागील १५ दिवसापासुन उपचार घेत असतांना आज दिनांक २७ एप्रिल रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यु पश्चात पत्नी , एक मुलगा , एक मुलगी असा परिवार असुन , अतीश्य हसरे व्याक्तीमत्व सर्वांच्या कामात धावुन जाणारे एक बोलके व्यक्ती म्हणुन ते सर्वाना परिचित होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या सातोद कोळवद गावात शोककळा पसरली आहे. इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारे एक चांगला अधिकारी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातुन निघुन गेल्याचे दु :ख झाले असल्याची शोकसंवेदना वैद्यकीय अधिकारी डॉ .बी .बी .बारेला व त्यांचे सर्व सह कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

 


Protected Content

Play sound