यावल प्रतिनिधी । यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे बदली झाल्याने त्यांचा कौटुंबिक स्वरूपात निरोप देण्यात आला.
यावेळी डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले की, कोरोनासारख्या महामारी संसर्गाच्या संकटात पंचायत समितीच्या माझ्या सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी कुटुंब प्रमुख म्हणुन दिलेली प्रत्येक शासकीय कार्यात साथ ही माझासाठी महत्वाची होती. पुढील शासकीय सेवेकरीता आयुष्यात प्रेरणादायी ठरणार आहे, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी सांगितले.
यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणुन डॉ निलेश पाटील हे मागील दोन वर्षापासुन कार्यरत होते. दरम्यान तत्काकालीन गटविकास अधिकारी म्हणुन यावल येथे सेवेत असलेले वाय.पी. सपकाळे यांची अचानक बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर बऱ्याच दिवसापर्यंत कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर ग्रामीण क्षेत्राच्या विकासाचे कार्य मंदावले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणुन डॉ. निलेश पाटील यांनी यावल पंचायत समितीची सुत्रे स्विकारल्या नंतर विकासाच्या प्रलंबित कामांना गती मिळाली होती.
याप्रसंगी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, गटशिक्षणाधिकारी नईम शेख, कृषी अधिकारी डी.पी. कोते, कृषी विस्तार अधिकारी धिरज हिवराळे, विजतंत्री अधिकारी आर. पी. देशमुख, कार्यालयीन कक्ष अधिकारी सरवर तडवी यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष रुबाब तडवी, ग्रामसेवक हितेंद्र महाजन, रविंद्र बाविस्कर, मजीत तडवी, कार्यालयीन कर्मचारी मिलींद कुरकुरे, अझहरोद्दीन फारूकी, जावेद तडवी आदी कार्यक्रमास उपस्थित होते .