यावल, प्रतिनिधी । कोरोना या संसर्गजन्य अत्यंत घातक अशा आजारामुळे आधीच धास्तावलेले नागरिक शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा व तसेच डुकरांचा वावर वाढल्याने कुटुंबांच्या आरोग्याला घेऊन चिंतेत दिसून येत आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने वेळीस तात्काळ दखल घेऊन अशाप्रकारे फिरणाऱ्या मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
यासंदर्भातील वृत्त असे की, शहरातील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गंगानगर पालक नगर, आयशा नगर, चांदनगर, यावल बस स्थानक परिसर, भुसावळ टी पॉइंट, विरार नगर आदी ठिकाणी मोकाट फिरणारे पिसाळलेले कुत्रे हे अनेक वेळा नागरिकांच्या शेळी, बकऱ्यांना शिकार बनवित आहेत. यामुळे शेळी पालन करणारे नागरिक मोठ्या अडचणीत आले असून तसेच हे मोकाट फिरणारे, पिसाळलेले कुत्रे प्रसंगी दुचाकी वाहना समोर येऊन त्या वाहनचालकावर धाऊन जातांना दिसून येत आहे. अशावेळी त्या वाहनधारकांचा अपघात देखील होऊ शकतो. त्याचप्रमाणे नवीन वसाहतींमधील विविध भागात डुकरांची वाढती संख्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारी असून तेव्हा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने वेळीच दखल घेऊन अशाप्रकारे फिरणाऱ्या मोकाट पिसाळलेले कुत्रे व डुकरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहे