Home Cities जळगाव म्हासावद येथे विद्यार्थांनी दांडिया खेळून साजरा केला नवरात्रोत्सव

म्हासावद येथे विद्यार्थांनी दांडिया खेळून साजरा केला नवरात्रोत्सव

0
33

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथील कै. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मेडीयम स्कूलच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांकडून दांडीया उत्सव साजरा करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील कै. द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मेडीयम स्कूलच्या वतीने नवरात्रोत्सव गुरूवार २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषेत नवरात्रीच्या दांडीया उत्सवात सहभाग नोंदविला होता. शाळेच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांकडून प्रतिसाद मिळाला. यावळी मुख्याध्यापिका संगिता पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक प्रतिक माळी, समन्वयक हर्षल सोमाणी, शिक्षक वैशाली पगारे, उज्वला सोनवणे, पवन येवले, भारती गोसावी, सुजाता गोसावी, रूपल अहिरे, सविता पवार, रोहिणी वाघ, योगीता पाटील, स्नेहल पाटील, शितल सोनकुळ आदींनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound