Home Cities जळगाव म्हसावद येथे घरफोडी; ३७ हजारांची रोकड लंपास

म्हसावद येथे घरफोडी; ३७ हजारांची रोकड लंपास


जळगाव प्रतिनिधी । घराची मागच्या दरवाजाची कडी तोडून घरातील ३७ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना तालुक्यातील म्हसावद येथे घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, समिर ताहेर देशपांडे (वय-२०) रा. पटेलवाडा म्हसावद ता.जि.जळगाव गुरूवारी १ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जेवण करून झोपले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटा घराच्या मागच्या दरवाजाची कडी तोडून घरात घुसून घरातील ३७ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याचे आज सकाळी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे.


Protected Content

Play sound