जळगाव, प्रतिनिधी । मौलाना आझाद महामंडळास विविध समस्यांना तोंड देत असून या समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी मागणी जळगाव शहर कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग महानगर जिल्हाध्यक्ष अमजद पठाण यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात केली आहे.
मौलाना आझाद महामंडळात विविध समस्यांना २०१४ पासून व्यवसायाची कोणतीही कर्ज योजना नाही, तरी सर्व कर्ज योजना सुरु करण्यात यावी. या आगोदर २०१४ पूर्वी मुदत कर्ज योजना, थेट कर्ज योजना, बचत गट कर्ज योजना सुरु होती, त्या कर्ज योजना पुन्हा सुरु करण्यात याव्यात. अल्पसंख्याक समाजाचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज मिळाले असून शिक्षण होऊनही नोकरी मिळालेली नाही. तसेच जीएसटीमुळे आज रोजी कोणतेही धंदे नफ्यात चालत नाहीत, त्यामुळे या आगोदर दिलेले शिक्षणाचे व व्यवसायाचे कर्ज माफ करण्यात यावे, जिल्हा कार्यालयासाठी स्वतःची शासनाची इमारत देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.